Type Here to Get Search Results !

अंधश्रद्धेतून आई – वडिलांनीच केली ६ वर्षीय चिमुकलीला मारहाण; चिमुकलीचा जागीच मृत्यू!

 


नागपूर : सतत मुलगी आजारी राहणे आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची शंका होती. मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेतून मुलीची यातून मुक्तता करण्याच्या नावाखाली आई-वडिलांनी तिला जबर मारहाण केली. त्यात सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, नागपूरच्या सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या दाम्परत्ये सहा वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहे. आपली मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने तिला भूतबाधा झाल्यासची शंका आई– वडीलांना होती. या दरम्यान त्यांनी एका भोंदू बाबाकडे नेले असता या बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता.



तसेच, शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री सदर दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. ती चिमुकली जबर मारहाण केल्याने  निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता.


दरम्यान, याप्रकरणी आरोपी आई– वडील व मुलीची मावशी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies