Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार १६ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

आत्मविश्वास वाढीस लागेल. शेअर्स मधून लाभ संभवतो. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल.



वृषभ:

तरुणांनी आळशीपणा करू नये. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. सामाजिक भान ठेवणे हिताचे. कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे. 


मिथुन:

योग्य तर्क बांधावा लागेल. महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे. मनाची उदासीनता दूर सारावी. जोखीम घेताना सावध रहा. 


कर्क:

आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. रेस जुगाराची आवड जोपासाल. घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. मुलांचा खोडकरपणा वाढेल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. 


सिंह:

कामात तत्परता दाखवावी. मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा. बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल. तरुणांना करियर विषयाची चिंता सतावेल. बौद्धिक ताण घेऊ नका.

 

कन्या:

वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक ठेवाव्यात. झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाला वाटा फुटू शकतात. 


तूळ:

जोडीदाराशी जुळवून घ्यावे. कौटुंबिक गोष्टींचा प्राधान्याने विचार करा. दृष्टीकोनात बदल करून पहा. तरुण वर्गाचे मत जाणून घ्या. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. 


वृश्चिक:

हाताखालील लोकांवर फार अवलंबून राहू नका. सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. आपल्या मनाप्रमाणे वागणे ठेवाल. हेतू समजून प्रतिक्रिया द्यावी. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. 


धनू:

जुनी कामे सामोरी येतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा.गरजेनुसार काही बदल करून पहा. मनातील नसती चिंता बाजूस सारा. 


मकर:

स्थावर व्यवहारातून लाभ होईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. घरातील वातावरण तप्त राहू शकते. 


कुंभ:

मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतील. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका.वैवाहिक जीवनात आनंद वाटेल. सहकारी अपेक्षित मदत करतील. 


मीन:

आहारावर नियंत्रण ठेवा. आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका. काटकसरीवर भर द्यावा. जवळचे मित्र भेटतील. तोंडात साखर ठेवून बोलावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies