Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांना आज जामीन मिळणार की कोठडी?



मुंबई: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्याअटकेत असलेल्या संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यामुळे, शिवसेना खासदार  संजय राऊत यांना आज जामीन मिळणार की कोठडी? याचा आज  निर्णय होणार आहे. ईडी  आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे.



दरम्यान,  ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा प्रश्नही उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. ईडी आज पुन्हा एकदा कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आज जामीन मिळणार की कोठडी? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies