आजचे राशीभविष्य, रविवार २१ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. बरेच दिवस राहून गेलेली गोष्ट वाचनात येईल. हाती आलेली कामे पूर्ण होतील. खर्च बेताचा ठेवावा. कामात अधिक चिकाटी ठेवावी लागेल. 



वृषभ:

घरातील वातावरण प्रसन्न राहील. समजून-उमजून गुंतवणूक करावी. जुने विचार बाजूला सारावे लागतील. चांगले साहित्य वाचनातून आनंद मिळेल. मन प्रसन्न राहील. 


मिथुन:

मित्रांची भेट घेणे शक्य होईल.  गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. अनामिक भीती दूर सारावी. हातातील अधिकार लक्षात घेऊन वागावे. जुनी येणी वसूल होतील. 


कर्क:

जबाबदारी टाळून चालणार नाही. जोडीदाराशी सहमत राहावे लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेदाची शक्यता.आरोग्याची पथ्ये पाळावीत. खोटेपणाचा आधार घेऊ नका. 


सिंह:

एकाच गोष्टीवर अडून राहू नका.आत्मविश्वास कायम ठेवावा. गोड बोलून मने जिंकून घ्याल.नोकरीतील जुनी कामे मार्गी लागतील. कामातून समाधान शोधाल. 


कन्या:

उत्तम गृहसौख्य लाभेल. व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा. महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी. झोपेची तक्रार जाणवेल.   फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. 


तूळ:

थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता. जोडीदाराची इच्छा पूर्ण करावी लागेल. घरातील कामात दिवस जाईल. महत्त्वाची कामे प्रलंबित पडू शकतात. मित्रमंडळींशी संवाद साधावा. 


वृश्चिक:

पोटाची काळजी घ्यावी. उत्साह कायम ठेवावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. मनात बरेच दिवसांपासून घोळत असलेली इच्छा आमलात आणाल. 


धनू:

ज्येष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.आपले व्यक्तिमत्व जपण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला दर्जा सुधारता येईल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. वेगळा विचार करून पाहावा. 


मकर:

आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. तुमचे मनोबल उंचावेल. जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका. मनातील इच्छा साकारता येईल. उतावीळपणा करून चालणार नाही. 


कुंभ:

मन काहीसे चंचल राहील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. प्रेमसंबंध सुधारतील. उत्कृष्ट कलेचा अनुभव घ्याल. उतावीळपणाने वागून चालणार नाही. 


मीन:

सौम्य शब्दांचा वापर करावा. उत्साह व धडाडी योग्य कारणासाठी वापरा. घरात टापटीप ठेवाल.चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured