Type Here to Get Search Results !

बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण!



मुंबई: बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका ३० वर्षीय कॉस्च्युम डिजायनरने राहुल जैनवर बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 



माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल जैन यांनी तिच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने तिच्या कामाचे कौतुकही केले. महिलेला त्याचा वैयक्तिक कॉस्च्युम डिजायनार म्हणून नियुक्त केले जाईल असे आश्वासन देऊन उपनगरातील अंधेरीतील  त्याच्या फ्लॅटवर भेटायला सांगितले.



महिला ११ ऑगस्ट रोजी जैन यांना त्यांच्या फ्लॅटमध्ये भेटायला गेली. त्यावेळी राहुल यांनी आपल्याला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेत बलात्कार केला. तसेच, विरोध केला असता जैन यांनी आपल्याला मारहाण तसेच पुरावे नष्ट करण्याचा आरोपही पीडित महिलेने केले आहेत.



दरम्यान, राहुल जैन यांनी महिलेनं केलेले आरोप खोटे असून आपण सदरील महिलेला ओळखत नसल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies