Type Here to Get Search Results !

विमानात प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक: नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे आदेश!



नवी दिल्ली:  देशात कोरोनाची साथ वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आता विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने आदेश दिले आहेत मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू आहे.



दरम्यान, राजधानी दिल्ली,  पंजाबमध्येही मास्कसक्ती प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.  सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies