Type Here to Get Search Results !

रक्षाबंधनासाठी आलेल्या विवाहितेने माहेरीच केली गळफास घेत आत्महत्या!



पाचोरा (जळगाव) : शेवाळे (ता. पाचोरा) येथील रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शेवाळे येथील नानू हादगे यांची मुलगी उमा हिचा विवाह गेल्या तीन महिन्यापूर्वी मे २०२२ मध्ये जळगाव येथील प्रेमनाथ उमप यांचा मुलगा सनी याच्याशी झाला होता. विवाहानंतर उमा ही दोन, तीन वेळा माहेरी आली. अत्यंत आनंदाने सासरी गेली होती. मात्र रक्षाबंधनानिमित्त शुक्रवारी (ता. १२) उमा वडिलांसोबत माहेरी आली व रात्री गावातीलच शीला गायकवाड या मावशीकडे झोपण्यासाठी गेली. मावशीकडे रात्री बराच वेळ तिने गप्पा मारल्या. शनिवारी (ता १३) सकाळी उमा आपल्या घरी आली व मी आंघोळीला जाते असे सांगून स्नानगृहाकडे निघाली. बराच वेळ झाला तिच्या वडिलांनाही अंघोळ करून बाहेर जायचे असल्याने ते स्नानगृहाकडे गेले. तेव्हा उमा तेथे दिसली नाही म्हणून त्यांनी स्वयंपाक घरात डोकावून पाहिले असता उमा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी उमाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले व शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.



दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलिस कर्मचारी राकेश खोंडे तपास करीत आहेत.तसेच आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies