पतीपासून विभक्त असणाऱ्या ३५ वर्षीय महिलेवर ३ जणांनी केला अत्याचार !भंडारा: मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात ३५ वर्षीय महिलेवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला अत्याचार केला आणि त्यानंतर पीडितेला रस्त्याकाठी फेकण्यात आले. पीडितेवर सध्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.याबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पीडित महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहत असून नकुतीच गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे बहिणीकडे राहत होती. दरम्यान ३० जुलैला बहिणासोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात आईकडे जाणासाठी ती घरातून निघाली. घरातून बाहेर निघाल्यानंतर प्रथम दर्शनी संशयित आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तर दुसऱ्या दिवशी ३१ जुलैला पळसगांव जंगलात नेऊन अत्याचार केला. यानंतर आरोपींनी या महिलेला जंगलातच सोडून दिले आणि पळ काढला.तसेच, या अत्याचारानंतर पीडिता जंगलातून निघून लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह येथे पोहचली. याठिकाणी असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली असता तिथे तिची दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोन सोबत भेट झाली. तिथे त्यानेही घरी सोडून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केली आणि त्याच्या मित्रासोबत १ ऑगस्टला अत्याचार केले. या अत्याचारांनंतर कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजेच्या सुमारास महिलेला विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. दरम्यान, ही पीडित महिला नागरिकांना दिसताच पोलिसांनी महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर आले.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured