Type Here to Get Search Results !

घरकुल मिळत नसल्याने महिलेने ‘हे’ केले भयंकर कृत्य!



यवतमाळ : यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वाई येथील महिलेचा आत्मदाहनाचा प्रयत्न केला. घरकुल मिळत नसल्याने महिलेने हे कृत्य केल्याचे दिसून आले .दरम्यान, शहर पोलिसाच्या सतर्कमुळे अनर्थ टळला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, घरकुल मिळावे यासाठी महिला ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी तिच्यासोबत पेट्रोल होते. महिला आत्मदहन करणार असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. 



दरम्यान, घरकुल मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून ही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदाहनाचा प्रयत्न केलाशांता बनसोड असे महिलेचे नाव असून महिला यवतमाळ तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies