Type Here to Get Search Results !

न्यायाधीश साहेब... माझं शेवटचं बयाण आहे; असा व्हिडिओ बनवत तरुणाने केली आत्महत्या!



अकोला- अकोल्यातील उगवा येथील सुभाष भातकुले (३६) आणि आशिष अडचुले (३५) या दोघांनी २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परंतु आशिषने आत्महत्या पूर्वी तीन व्हिडिओ तयार केले असून आत्महत्येला अनेक जण जबाबदार असल्याचे म्हटले आहे.


आशिषने आत्महत्या पूर्वी बनवला व्हिडिओमध्ये टो म्हणाला कि, न्यायाधीश साहेब... माझं शेवटचं बयाण आहे, अकोट फैल पोलिसांनी माझी फसवणूक केली. माझ्याकडून पाच गुटख्याचे पाकीट पकडले आणि पोलिसांनी माझ्याकडून एक लाख रुपये घेतले. तुझ्यावर कारवाई करत नाही, तू पैसे दे पैसे घेतल्यानंतर सांगितलं की वरुन खूप दबाव आहे. आता तुझ्यावर कारवाई करावीच लागते.


तू टेंशन घेवू नको, तुला पोलीस कोठडी मागत नाही. अशा पद्धतीने तुझ्यावर कारवाई करतो, अशा प्रकारे दबाव आणला. नितीन सुशील, पांडे साहेब, इंगळे साहेब, असलम साहेब, तोपकर मेजर, दाते मेजर, छोटू पवार हे सर्व कर्मचारी आहे. सर्व अकोट फैल पोलीस ठाण्यातील आहेत. त्यात आणखी दोघांचा समावेश असून त्यांची नावे मला आठवत नाहीत. या सर्वांनी मला दबावात घेत माझ्यावर कारवाई केली. मी दुकानदार आहे काही गुन्हेगार नाही.


न्यायाधीश साहेब, माझा व्हिडिओ तुमच्या पर्यंत येईल, तुम्ही योग्य रीतीने कारवाई कराल आता पोलिसांवर माझा विश्वास राहिला नाही. भांडे आणि येणकर मेजर यांना देखील हप्ते दिले, माझ्याजवळ कुठलाही मुद्देमाल सापडला नव्हता. परंतु तरीही पोलिसांनी चुकीची कारवाई केली. हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. असा व्हिडिओ तयार करत आशिषने आत्महत्या केली आहे.


दरम्यान, मृतक आशिष अडचुले याच्याविरुद्ध अकोट फेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने पोलिसावर केलेले आरोप निराधार आहेत. त्याच्या कुटुंबियांनी अद्याप पोलिसांविरोधात तक्रार दिलेली नाही आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. या संदर्भात पुढील तपास शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies