Type Here to Get Search Results !

प्रेमप्रकरणातून सख्या भावाने बहिणीची आणि तिच्या प्रियकराची केली हत्या!



चोपडा (जळगाव) : प्रेमप्रकरणातून सख्या भावाने बहिणीची गळा आवळून तर तिच्या प्रियकराची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वराड रस्त्यावरील नाल्यात शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली. यात प्रेमप्रकरणातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. पुंडलिकनगर, चोपडा), राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपुरा, चोपडा) यांची हत्या करण्यात आली. राकेश राजपूत हा वर्षा कोळी हिच्या शहरातील पुंडलीकनगर येथील घरी गेला होता. तिथे राकेश व वर्षा हिच्या भावंडांमध्ये वाद झाला. राकेश वारंवार घरी येतो, यामुळे आपल्या घराची समाजात बदनामी होते, या रागातून राकेश व वर्षाला घेऊन करण ऊर्फ कुणाल समाधान कोळी (वय १७, पुंडलिकनगर, चोपडा), नीलेश समाधान कोळी (वय १५, पुंडलिकनगर,चोपडा), भरत संजय रायसिंग (२१, रा सुंदरगढी, चोपडा), तुषार आनंदा कोळी (२३, रा. माचले, ता. चोपडा), बंटी ऊर्फ जय शांताराम कोळी (१९, रा. बोरोलेनगर, चोपडा) यांनी मोटारसायकलवरून शहरातील चिंच चौकाकडून जुन्या वराड रस्त्याकडे नेले. तिथे पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर राकेशने रस्त्याकडेला असलेल्या नाल्याकडे पळ काढला.



दरम्यान, राकेशला गाठत संशयित कुणाल कोळी व तुषार कोळी याने गावठी कट्ट्यातून राकेशवर गोळी झाडत हत्या केली. तर वर्षा हिचा रुमालाने गळफास देत खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली. सख्खे व चुलत अशा पाच भावंडांकडून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यातील तरुणीचा १७ वर्षीय अल्पवयीन भाऊ स्वतः गावठी कट्ट्यासह शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यातील पाचही संशयिताना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies