Type Here to Get Search Results !

‘या’ भाजप आमदाराला अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण!



हैदराबाद: तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजा सिंह यांच्याविरोधात कलम २९५ (ए), १५३ (ए) आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  


याबद्दल अधिक माहिती अशी कि, राजा सिंह यांनी स्टँडअप कॉमेडियन मुन्नवर फारुखीचा हैदराबादमधील कार्यक्रम रोखण्याचा बराच प्रयत्न केला होता. मात्र, तेलंगणा पोलिसांच्या  कडेकोट सुरक्षेनंतर हा कार्यक्रम झाला. त्यानंतर राजा सिंह हे संतापले होते. त्यांनी मुन्नवर फारुखी आणि समाजाच्या विरोधात वादग्रस्त टिप्पणी करणारा व्हिडिओ शेअर केला. त्यात शिवीगाळही करण्यात आली होती.


दरम्यान, हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच, अनेक पोलीस ठाण्यांमध्ये राजा सिंह यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या. तसेच राजा सिंह यांना अटक करण्याची मागणी केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies