मित्राने आत्महत्या केल्याचे दु:ख सहन न झाल्याने तरुणाने केले ‘हे’ भयंकर कृत्य!औरंगाबाद:  औरंगाबादमध्ये एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. पंढरीनाथ रघुनाथ पारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पण आपला जिवलग मित्र पंढरीनाथ आपल्याला सोडून कायमचा निघून गेल्याचे कळताच त्याच्या मित्रावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर पंढरीचा मित्र कल्पेशनेही विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. कल्पेश राजू गायकवाड असे पंढरीनाथच्या मित्राचे नाव आहे. याबद्दल अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे जिवलग मित्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी तरुणाने देखील आत्महत्या केली. कल्पेश राजू गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे.दरम्यान, या घटनेने मांजरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured