सिद्धू मुसेवालाच्या हत्येत जवळच्या मित्रांचा हात?नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात झाली होती. सिद्धूची हत्या करणाऱ्या सहा शूटर्सपैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एकजण अजुनही फरार आहे. आता यावर सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी मोठा दावा केला आहे. 'मुलाचे अजूनही काही शत्रू आहेत, त्यांची नावे लवकरच उघड करणार असल्याचे म्हटले आहे.'काही लोक माझ्या मुलाच्या करिअरचे शत्रू बनले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीला तो ज्या लोकांना भेटला ते योग्य लोक नव्हते हे त्याचे दुर्दैव होते. त्याला हे कळत नव्हते की जे आपले भाऊ असल्याचा दावा करतात ते उद्या त्याचे शत्रू होतील. मी त्यांचे नाव घेईन. वेळ येऊ द्या काही दिवसांची गोष्ट आहे. कोणी काय केले हे मी सर्व काही स्पष्ट करणार आहे, असे बलकौर सिंह म्हणाले.तसेच, त्या जवळच्या लोकांनी मुलाच्या गाण्यांमधून शब्द काढून सरकार आणि गुंडांना भडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यात यश मिळू न शकल्याने मुसेवाला यांना मारण्याची योजना त्यांनी आखली, असेही बलकौर सिंह म्हणाले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured