Type Here to Get Search Results !

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचे नाव?; वकिलांनी केला मोठा खुलासा!



मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, काही काळापासून तिचे नाव सुकेश चंद्रशेखर मनी लॉंडरिंग प्रकरणाशी जोडले जात होते. अशा परिस्थितीत जॅकलिनच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच जात आहेत. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचे नाव सातत्याने समोर येत आहे. अशातच आता जॅकलीन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे.



अभिनेत्री जॅकलीनचे वकील प्रशांत म्हणाले की, 'आतापर्यंत आम्हाला फक्त एवढीच माहिती मिळाली आहे की ईडीने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्याप यावर ईडीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. माझ्या क्लायंटला अद्याप अहवालाची कोणतीही प्रत मिळालेली नाही. फक्त मीडिया रिपोर्ट्समुळेच, तर जॅकलीनला या प्रकरणात आरोपी म्हणून संबोधले जात आहे आणि हे खूप दुःखदायक आहे'.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies