Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार ३१ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 


मेष:

हातातील काम नेमकेपणाने कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. 



वृषभ:

आजचा दिवस मनासारखा जाईल. अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. राजकीय स्पर्धक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. 


मिथुन:

प्रेमातील व्यक्तीने नातेसंबंध दृढ होतील. चंचलतेला आवर घाला. मनात उगाचच शंका निर्माण होतील. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. 


कर्क:

मनातील आकांक्षेपुढे बाकी गोष्टी गौण वाटतील. तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या.  


सिंह:

भौतिक सुखात वाढ होईल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. भाग्याची भक्कम साथ मिळेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. 


कन्या: 

आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. मित्र परिवारात वाढ होईल. मोठी खरेदी केली जाऊ शकते. सहकारी कामात मदत करतील. अभ्यासात कमी पडू नका. 


तूळ:

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा. जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. जुगारातून धनलाभ संभवतो.  काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. 


वृश्चिक:

खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तुत्वाला चांगला वाव आहे. शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील.


धनू:

व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल. तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 


मकर:

मालमत्तेचे वाद मिटतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा.  तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. भागीदारीत सावधानता बाळगावी.  जोडीदार तुमच्यावर खुश राहील. 


कुंभ:

सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्या. 


मीन:

प्रेमात वाहून जाऊ नका. घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. भावनेला आवर घालावी लागेल. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies