Type Here to Get Search Results !

“….जो मिळेल त्याच्याशी युती केली”: ‘यांचा’ उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!



मुंबई:  सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!, असे राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी, संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.


 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचे कारण संभाजी ब्रिगेडने सांगितले. यावरून मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies