मुंबई: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान न्यायलयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की कोठडी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.