Type Here to Get Search Results !

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा विजय; न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदकाला गवसणी!



नवी दिल्ली: कॉमनवेल्थ स्पर्धेतील दहाव्या दिवशी कांस्यपदकासाठी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत केले. नियमित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. मात्र, यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. 


दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयामुळे भारताच्या झोळीत आणखी कांस्यपदक पदक पडले. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताची पदकसंख्या 41 वर गेली. ज्यात 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकाचा समावेश आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies