Type Here to Get Search Results !

चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा!

 


पुणे: चार अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात निलंबित सनदी अधिकारी मारुती सावंत याला विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मारुती सावंत हा १९९८ च्या बॅचचा बढती मिळालेला सनदी अधिकारी होता. त्यावेळेस महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या महासंचालक पदावर कार्यरत होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने त्याच निलंबन केले. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तेरा वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेतील माजी महासंचालकाला विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरी आणि सात लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मारुती हरी सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सावंत याच्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम, धमकावणे, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये ५ मार्च २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.



दरम्यान, सावंत एका तेरा वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. याबाबत सिंहगड पोलिसांनी एका मुलीवर लैंगिक अत्याचार आणि इतर तीन मुलींचा लैंगिक छळ असा गुन्हा दाखल करुन कारवाई केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies