Type Here to Get Search Results !

“आमच्याकडे या, इकडे तुम्हाला मुख्यमंत्री बनायला...” ‘यांची’ मुख्यमंत्र्यांना खुली ऑफर!



मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवसही विरोधकांनी गाजवला. विधानसभेत बोलताना आज जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर दिली. 'भाजपमध्ये तुमचा अपमान होत आहे. तुम्ही आमच्याकडे या. तुम्हाला इकडे मुख्यमंत्री बनायला कोणती अडचण नाही', असे जयंत पाटील म्हणाले. 



'भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, त्यामुळे तो मनावरचा दगड काढून टाका आणि इकडे या... इकडे तुम्हाला मुख्यमंत्री बनायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही' अशी खुली ऑफर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. 



दरम्यान, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याच विधानाला धरून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies