कपाटात ठेवलेली दारू बायकोने संपवली म्हणून नवऱ्याने बायकोला...!उन्नांव : उत्तरप्रदेशातील उन्नाव शहरात नवरा आणि बायकोमध्ये विचित्र कारणावरून वाद झाला. घरात स्टॉक करून ठेवलेली दारू बायकोने संपवली म्हणून नवऱ्याने चक्क बायकोचा काटा काढला. मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. योगेंद्र तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पिंकी गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि,  उत्तरप्रदेशातील उन्नाव शहरातील प्रेमनगर परिसरातील योगेंद्र आणि पिंकीचा ५ वर्षापूर्वी विवाह झाला होता. योगेंद्र हा रिक्षा चालक असून तो प्रेमनगर येथील गौसिया मशिदीजवळ राहतो. शुक्रवारी रात्री कामावरून योगेंद्र उशीरा घरी पोहचला. यावेळी दारू पिण्यासाठी त्याने घरातील कपाट उघडलं. तेव्हा कपाटात ठेवलेल्या दारूच्या बाटल्या त्याला रिकाम्या दिसल्या. यावरून पिंकीला विचारलं असता, सगळी दारू मी पिऊन टाकली असल्याचे तिने कबूल केले.  दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात योगेंद्र याने पिंकीला बेदम मारहाण केली, त्याने पिंकीचे डोकं भिंतीवर आपटले. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, योगेंद्र याने पिकींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured