Type Here to Get Search Results !

“सध्या लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाहीवर हल्ले सुरू आहेत”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई: “आज बाळासाहेबांच्याकडे मी आशीर्वाद मागितला, माझी नेतेपदी नियुक्ती झालेली आहे कारण सध्या शिवसेना ही एका वेगळ्या परिस्थितीवर काम करत आहे. सध्या लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाहीवर हल्ले सुरू आहेत. मात्र, गद्दारांविरोधात काम करण्यासाठी, जो एक कडवट शिवसैनिक आहे तो तसाच उभा आहे. शिवाजी पार्कमध्ये न्यायाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाईला सुरुवात झाली. इथूनच जवळ असलेल्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनेला सुरुवात केली”, असे  अरविंद सावंत यांनी वक्तव्य केले. 



दरम्यान,  शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले त्यानंतर माध्यमांशी सवांद साधला यावेळी बोलतना त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies