Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार ६ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा.



वृषभ:-

मेहनतीला पर्याय नाही. आर्थिक आवक वाढेल. सवयी बदलाव्या लागतील. यश विलंबाने पदरात पडेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील.



मिथुन:-

आज प्रेमाची अनुभूती येईल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत. आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. 



कर्क:-

मनाची चंचलता आवरावी. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका. वरिष्ठांना नाराज करू नका. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील.



सिंह:-

अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.



कन्या:-

सामाजिक बांधीलकी जपावी. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल.



तूळ:-

गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात.



वृश्चिक:-

मुलांशी वाद होऊ शकतो. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे.



धनू:-

घरातील वातावरण संमिश्र राहील. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल.



मकर:-

स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल. कामासाठी बाहेर राहावे लागेल.



कुंभ:-

सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा. दगदग व धावपळ टाळावी. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.



मीन:-

जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मन प्रसन्न राहील. प्रलोभनापासून दूर राहावे. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies