चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीने केली हत्या!नंदुरबार : चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीने दोरीने गळफास लावून हत्या केल्याची घटना नंदुरबारमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पती अनिल गुलाब तांबे वय ३० व पत्नी वंदना गुलाब तांबे वय २२ अशी पती पत्नीची नावे आहेत.याबद्दल अधिक माहिती अशी कि, नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात भाड्याच्या घरात राहणारे आणि मूळचे अमरावती  जिल्ह्यातील तालुका नांदगाव खंडेश्वर गाव रोहना येथील पती अनिल गुलाब तांबे (वय ३०) व पत्नी वंदना गुलाब तांबे (वय २२) हे दोघे पती-पत्नी स्टोव्ह, कुकर, गॅस रिपेरिंगचा व्यवसाय करतात. कामानिमित्त हे दोघे नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात राहण्यास होते. यावेळी चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीला दोरीने गळफास लावून पती अनिल तांबे याने पत्नीची हत्या केली.दरम्यान,  श्रावणी गावातील रहिवासी श्रावण बिजलाल कोकणी यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांनी मयताचा पती अनिल गुलाब तांबे याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured