Type Here to Get Search Results !

भर मार्केटमधून मुलीचे अपहरण; कॉफी सेंटरमध्ये नेऊन तीन वेळा केला बलात्कार!



बीड: बीडच्या गेवराई शहरामध्ये मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला, तोंडात बोळा कोंबून, दुचाकीवर टाकून दोघांनी पळविले. त्यानंतर महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये, एकाने तिच्यावर बलात्कार केला. 



मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एका छोट्याशा गावात, पीडित मुलीचे वडील शेतात सालगडी म्हणून काम करतात. यादरम्यान काल पीडिता आणि तिची बहिण गेवराई शहर शहरातील तिच्या चुलत्यांकडे आली होती. यावेळी चुलतीने सन उत्सवानिमित्त दोघी बहिणींना नवीन कपडे घेण्यासाठी मार्केटमध्ये नेले. कपडे घेऊन झाल्यावर, पीडितेची चुलती एक वस्तू आणण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेली. याचाच गैरफायदा घेऊन, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी, पीडितेच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून सुसाट वेगाने दुचाकी गेवराई पासून बीडच्या दिशेने नेली. त्यानंतर दोघांपैकी एकाने महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये पीडितेवर तीन वेळा बलात्कार केला.



दरम्यान, याप्रकरणी गेवराई पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपी रोहित अभिमान आठवले व त्याचा साथीदार सय्यद फरहाण याला अटक केली. आरोपींविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात, कलम 376 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies