माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली दि.०७ : शिवाजी विद्यापीठ द्वारे विविध अभ्यासक्रमाच्या ‘ऑनलाईन एमसीक्यू’ परीक्षा घेण्यात येत आहे. याबाबत काही कोर्सेसचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षेत निवडलेले पर्यायाची प्रत किवा ऑनलाईन सबमिट केलेले पर्याय याबाबतचा ‘डेटा’ गुणांच्या पडताळणी कामी देण्याबाबतची कोणतेही तरतूद शिवाजी विद्यापीठाकडे नाही, तसेच असा कोणताच ‘डेटा’ विद्यापीठ मार्फत स्टोरेज केला जात नाही अशी धक्कादायक माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.ए.एन.जाधव यांनी दिली. यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या सर्वच ऑनलाईन परीक्षेच्या पारदर्शक कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोविड कालावधीपासून सुरु असलेल्या या ऑनलाईन परीक्षा यातून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालण्याचे काम विद्यापीठ मार्फत सुरु आहे. ऑनलाईन परीक्षा मध्ये गुगल करून उत्तर शोधणे सहज शक्य आहे यामुळें कॉपीचे प्रमाण वाढले. लेखी परीक्षा बाबतची फोटो कॉपी मागविण्याची तरतूद विद्यापीठाकडे आहे पण ऑनलाईन, एमसीक्यू परीक्षा बाबत अशी कोणतीही तरतूद विद्यापीठ कडे नाही, याचा आम्ही निषेध करत असल्याचे अमोल वेटम म्हणाले आहेत.
अभियांत्रिकी, विधी आदी सह इतर अभ्यासक्रमासाठी लिखाण आवश्यक आहे. त्यामुळे आगामी सत्रातील सर्वच परीक्षा लेखी स्वरुपात व्हावेत , तसेच ९० दिवसांचे अध्यापन झाल्याशिवाय परीक्षा घेण्यात येऊ नयेत, यासह अन्य मागण्यांचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम, रोहन पाटील, अभिषेक गडदे आदी उपस्थित होते.