Type Here to Get Search Results !

भरधाव कारने ६ जणांना चिरडले; ६ जणांचा जागीच मृत्यू!



अहमदाबाद : गुजरातमधील आनंद जिल्ह्यात भरधाव वेगात जाणाऱ्या कारने ऑटो रिक्षा आणि दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वारासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात कार चालवणारी व्यक्ती ही गुजरातमधील कॉंग्रेस आमदार पूनम परमार यांचा जावई असल्याचे बोललं जात आहे.याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी कॉंग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रन केसची तक्रार दाखल केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, गुजरातमधील आनंद जिल्ह्यात कारने ज्या रिक्षाला धडक दिली. त्या रिक्षातून ४ प्रवासी प्रवास करीत होते.रिक्षामधील चारही लोक एकाच कुटुंबातील असून आईसोबत २ मुली होत्या. ज्या भावाला राखी बांधून घरी परतत होत्या. तर बाईकवर २ जण होते. या अपघातात  ४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन जणांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.



दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडसंहिता ३०४ अंतर्गंत आरोपीला अटक केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies