Type Here to Get Search Results !

कार थेट कोसळली दरीत; ७ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी!



जम्मू :जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात एक भरधाव वेगात जाणारी कार थेट दरीत कोसळली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, किश्तवाडच्या चिनगाम भागात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कारवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात सुमो कार ही थेट दरीत कोसळली. या कारमधून ११ प्रवासी प्रवास करीत होते. यामधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.



दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies