Type Here to Get Search Results !

समुद्राची पाणीपातळी १ फुटाने वाढणार; ‘या’ शहरांना सर्वात जास्त धोका!मुंबई:  ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या वेगाने ग्रीनलँडचा बर्फ वितळू लागला आहे. यामुळे शास्त्रज्ञांनी अतिशय निर्वाणीचा इशारा देताना काहीही करा, समुद्राची पाणीपातळी एका फुटाने नक्कीच वाढणार असल्याचे म्हटले आहे. ग्रीनलँडचा बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पाणी पातळी कमीतकमी एका फुटाने तरी नक्कीच वाढणार आहे. आज, आता जरी जगातील उष्णतेचे उत्सर्जन रोखले तरी देखील तुमच्या हाती काहीच राहिलेले नाही, बर्फ वितळणारच, त्याला रोखू शकत नाही, असे नेचर क्लायमेटच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शास्त्रज्ञ जेसन बॉक्स यांच्या मतानुसार कोणत्याही प्रकारच्या हवामानात बर्फ वितळेल आणि समुद्राची पातळी वाढेल. वितळण्याची ही प्रक्रिया किती काळ चालेल हे सांगता येणार नाही. परंतू शतकाच्या अखेरपर्यंत ती सुरु राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. उष्ण हवेमुळेच नाही तर समुद्राच्या पाण्याची उष्णता देखील वाढल्याने पाण्याखालील बर्फदेखील वितळू लागला आहे. यामुळे हिमकडे कोसळू लागले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने या वर्षाच्या सुरुवातीला असाच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. पुढील 30 वर्षांत अमेरिकेच्या किनार्या्वरील पाणी 10-12 इंचांनी वाढेल, असे या अहवालात म्हटले होते. भरतीच्या वेळी सर्वाधिक धोका असेल असेही यामध्ये म्हटले होते. यामुळे मुंबईसारखी समुद्रकिनाऱ्यांवरील शहरे धोक्यात येतील असेही यात म्हटले होते.(सौ.लोकमत)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies