Type Here to Get Search Results !

‘येथील’ मृत गोविंदाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यानी केली १० लाखाची मदत जाहीर!



मुंबई: विलेपार्ले पूर्व येथील शिवशंभो पथकातील गोविंदा संदेश दळवी हा दहीहंडीच्या दिवशी थरावरून पडून गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदेश दळवी याच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, विलेपार्ले पूर्व येथील शिवशंभो पथकातील गोविंदा संदेश दळवी हा थरावरून पडून गंभीर जखमी झाला होता. शुक्रवारपासून संदेशवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, काल सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 



अशातच आज अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मृत गोविंदा संदेश दळवीच्या नातेवाईकांना तातडीने १० लाखाची मदत करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, जखमींना दोन अवयव निकामी झालेल्यांना मुख्यमंत्री निधीतून ७ लाख रुपये मदत, एक अवयव निकामी झालेल्यांना ५ लाख व मृत गोविंदा पथकाला १० लाख मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून दिला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याआधीच जाहीर केलं होते. त्यानुसार आज मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.


तसेच, 10 लाखांची मदत तर आहेच, पण त्याच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सरकार मदत करणार असल्याचे भाजपनेते मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies