Type Here to Get Search Results !

पगार हजारात अन् खासदाराच्या क्लर्कची संपत्ती करोडोंमध्ये; जाणून घ्या काय आहे प्रकरण...!



मध्य प्रदेश - वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत लिपिक हिरो केसवानी यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. हिरो केसवानीच्या घरातून सुमारे 85 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची जमीन आणि घराची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. केसवानी यांच्याकडे सुमारे चार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची कागदपत्रे मिळाली आहेत. तसेच,  तपास पथकाची कारवाई टाळण्यासाठी केसवानी यांनी फिनाईल प्यायले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.



हिरो केसवानीची तीन मजली आलिशान इमारत आहे. बैरागढमधील हिरो केसवानी यांच्या इमारतीची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. बैरागढच्या आसपास विकसित होत असलेल्या वसाहतींमध्ये हिरो केसवानी यांनी महागडे भूखंड खरेदी केले आहेत. हिरो केसवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचेही आढळून आले आहे. हिरो केसवानी यांच्या घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. हिरो केसवानीने 4,000 रुपये प्रति महिना पगार घेऊन नोकरी सुरू केली होती आणि सध्या त्यांचा पगार 50,000 रुपये प्रति महिना असून, त्यांची संपत्ती करोडोंमध्ये पाहून आर्थिक गुन्हे शाखाही आश्चर्यचकित झाली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies