Type Here to Get Search Results !

बहिणीस त्रास दिल्याने गळा चिरून युवकाचा केला खुन!


सातारा : सातारा जिल्ह्यात  बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणावरून युवकाचा गळा चिरून खुन झाल्याची माहिती लाेणंद पाेलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी चार युवकांना अटक केली आहे. 



मे महिन्यात राहुल मोहिते या युवकाचा पाडेगाव (ता. खंडाळा) येथे गळा चिरून खून झाला होता. या घटनेनंतर लोणंद पोलिसांनी संशयित आराेपींचा तपास सुरु केला हाेता. गेले तीन महिन्यांपासून लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेसषणाच्या आधारे शोध घेत होते. त्यात त्यांना यश आले आहे. या खूनप्रकरणी पाेलिसांनी चाैघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies