Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; या तारखेपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम!



मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना यांना आज जामीन मिळू शकलेला नाही. त्यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.


 

आज कोर्टात येताना संजय राऊत हे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असलेला भगवा रूमाल घालून आले होते. त्यानंतर राऊतांच्या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. ईडीने कोर्टात संजय राऊत यांची १० ऑगस्टपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याचे सांगितले. 



५ ऑगस्टला या प्रकरणी काही जणांना समन्स बजावले आहेत. दरम्यान, कोर्टाने ईडीची मागणी मान्य करत संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies