मुंबई: मुंबईच्या गोवंडीमध्ये एका गतीमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या पीडित तरुणीने समाजसेविकेच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुंबईतील गोवंडीच्या रफिकनगरमध्ये २५ वर्षीय गतीमंद तरुणी ही सावत्र आई आणि दोन लहान भावंडांबरोबर राहते. ही तरुणी कचरा वेचण्याचे काम करते. मागील एका वर्षापासून तिच्यावर ४४ वर्षीय अब्दुल मंना शेख याने जेवण देतो असे सांगून गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार करत होता. दरम्यान, गतीमंद तरुणी ही 'प्रायव्हेट पार्ट'ला दुखापत झाल्यामुळे ती उपचारासाठी रुग्णालयात गेली. त्यावेळी रुग्णालायतील डॉक्टरांना गतीमंद तरुणी ही दोन ते तीन महिन्याची गरोदर असल्याचे देखील समजले.
त्यानंतर पीडित तरुणीने समाजसेविकेच्या मदतीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. तसेच १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे