Type Here to Get Search Results !

व्हिडीओ! नोएडा मधील ट्विन टॉवर कोसळला पत्त्यासारखा!



नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये सध्या असलेला सुपरटेकचा 'ट्विन टॉवर' अल्पावधीतच पाडला आहे. ही इमारत नोएडाच्या सेक्टर-९३ मध्ये होती. यात सुमारे ८५० फ्लॅट्स होते. वर्षानुवर्षे मेहनत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतर बांधलेली ही इमारत काही सेकंदात कोसळली आहे. या दोन्ही इमारतींची उंची सुमारे १०० मीटर होती.



बांधकाम पाडण्यासाठी ३५०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. जवळपासचे निवासी भाग रिकामे करण्यात आले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



दरम्यान,  एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies