Type Here to Get Search Results !

स्वयंपाक न केल्याच्या रागातून पतीनेच केला पत्नीचा खून!



शिरपूर (धुळे) : आज (14 ऑगस्टह) सकाळी दहिवद (ता.शिरपूर) येथील शेतात स्वयंपाक न केल्याचा राग आल्याने पतीने कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करुन पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर संशयित पती पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला होता. त्याला पोलिसांनी अटक केली.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, बालाबाई संजय पावरा (वय 24) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा विवाह पाच वर्षापूर्वी कुकड्या (ता.सेंधवा, जि. बडवानी) येथील संजय मुकेश पावरा याच्याशी झाला होता. उभयतांना रोहित व अशोक अशी दोन मुले आहेत. स्वयंपाकाच्या कारणावरुन संजय नेहमीच बालाबाईला मारहाण करीत होता. आठवडाभरापूर्वी तो पत्नी व मुलांना घेऊन दहिवद येथील जयवंत शिसोदे यांच्या शेतात रखवालदारीसाठी आला होता. बालाबाईचे माहेरील कुटुंबही जवळच राकेश पाटील यांच्या शिवारात राहते. तिची आई सुलाबाई हिने रविवारी नातवंडांना घेऊन येण्यासाठी मुलगी नायला हिला बालाबाईकडे पाठवले. तेथे झोपडीबाहेर खाटेवर रक्तबंबाळ अवस्थेत बालाबाई पडली होती. ते दृश्य पाहून नायला आईकडे पळत गेली. माहेरील लोकांनी येऊन पाहिले असता बालाबाई निपचित पडल्याचे दिसून आले.



दरम्यान, घटनेबाबत समजताच  तातडीने  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित संजय पावरा याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सुलीबाई पावरा हिने दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies