Type Here to Get Search Results !

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येणार!



मुंबई: महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) "प्रो गोविंदा" स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, अशीही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली.



दरम्यानराज्यात प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि त्याच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, तसेच, आपल्याकडे असलेल्या कबड्डी, खो-खो, मल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही समावेश होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies