Type Here to Get Search Results !

काकांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी गेला अन कुटुंबीयांसमोरच तरूण...!



वडाळा : सोलापूर तालुक्यात काकांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी आलेला एक तरुण सीना नदीत बुडाला. या तरुणाला पोहता येत नव्हते. त्यातच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नातेवाईकांच्या डोळ्यासमोर तरुण पाण्यात बुडाला. नातेवाईकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. किशोर डिगाजी व्हटकर (वय 27) रा. हनुमान नगर सोलापूर असे नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, किशोर हा आपल्या काकांच्या अस्थी विसर्जन साठी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास पाकणी (ता.उ.सोलापूर ) येथील सीना नदीवरील बंधाऱ्यात आला होता. त्यावेळी त्याचे कुटुंबीय तसेच नातेवाईकही त्याच्यासोबत होते.अस्थी विसर्जन करण्यासाठी किशोर हा सीना नदीतील पाण्याच्या उतरला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अस्थी विसर्जन करताना किशोरचा तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी हात दिला मात्र त्यामधूनही तो निसटला. किशोरला पोहता येत नव्हते. नातेवाईकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. आरडाओरड केली मात्र पाण्याचा प्रवाह ठिकठिकाणी वाळु उपश्यामुळे पडलेले खड्डे यामुळे तो पाण्यात बुडाला. 



दरम्यान, चिंचोळी औद्योगिक वसाहती मधील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशामक कर्मचारी व अधिकारी यांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने तब्बल ३ तास शोध घेऊनही किशोर आढळून आला नाही. पोलिसांनी शोध मोहीम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies