Type Here to Get Search Results !

“चित्रा वाघ तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, नाहीतर महाराष्ट्रात...” ‘यांचा’ चित्रा वाघला गंभीर इशारा!



मुंबई: आमदार संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध केल्याने आता पोहरादेवीचे महंत यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोहरादेवीच्या महंतांनी संजय राठोड यांना राखी बांधा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा महंतांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.



महंत म्हणाले,'तुम्ही खरंच अभ्यासू असाल तर, बोलता तर कोणालाही येऊ शकते. केवळ प्रसिद्धीच्या मोहात जाऊन काही बडबड करू नका. तुम्ही बुद्धीवान असाल तर, संजय राठोड यांच्या हाताला जाऊन राखी बांधा, तुम्ही त्या ठिकाणी पापक्षालन करा. जेव्हा आमचे संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. अशी ताकीद देतो'.



तसेच, दुसरे महंत सुनील महाराज म्हणाले की, संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर आरोप होत असेल तर, येणाऱ्या २०२४ मध्ये त्यांची जागा दाखवू. तसेच भाजपलाही त्यांची जागा दाखवू' असे म्हणत  पोहरादेवीचे महंतांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना गंभीर इशारा दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies