शिंदे सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय!मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शासन निर्णय घेतले जात आहेत. गेल्या ३२ दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये चार कॅबिनेट बैठका घेण्यात आल्या आहेत. या चार कॅबिनेट मध्ये आत्तापर्यंत विक्रमी ७५१ शासन निर्णय घेतले आहेत. दरम्यान, शिंदे सरकारकडून निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य १०४, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग ८४ जीआर यामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आजवर झालेल्या कॅबिनेट बैठकांमध्ये कोट्यवधींचा निधी हा शिंदे गटाच्या आमदारांवर अक्षरश: उधळण होताना दिसून येत आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये ४५०० कोटी रुपयांच्या तीन सिंचन प्रकल्पांसाठी सुधारीत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याशिवाय, तिन्ही प्रकल्प हे शिंदे गटातील आमदारांच्या मतदार संघात आहेत. तसेच संदीपान भुमरे यांच्या पैठण , गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील वाघूर प्रकल्पासाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured