आजचे दिनविशेष; जाणून घ्या महत्वाच्या घटना!आटपाडी: आज 2 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे श्रावणातील मंगळागौरीपूजनाचा दिवस. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 2 ऑगस्ट : नागपंचमी.

सोमवार व्यतिरिक्त अगदी दुसऱ्याच दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच नागपंचमी. यंदा नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते.


2 ऑगस्ट : मंगळागौरी पूजन. 

श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. 1861 : आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. 1896 मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत. 1979 साली महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोर गरिबांसाठी आरोग्य सेवा सुरु करणारे दापत्य डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीस रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.1922 साली दूरध्वनी यंत्राचे जनक अमेरिकन वैज्ञानिक आणि अभियंता अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured