Type Here to Get Search Results !

पुलावर दुचाकी उभी करत नदी पात्रात तरुणाने मारली उडी!



अकोला : अकोला येथील गांधीग्राम येथील पुर्णा नदीत एका तरुणाने उडी मारली असून  या विद्यार्थ्याचा शोध आपत्कालीन पथकाकडून सुरु आहे. नदी पात्रात उडी मारलेल्या तरुणाचे नाव अक्षय गजानन ताथोड असे आहे. तो अकोल्यातील विश्वकर्मा नगर मोठी उमरी येथे राहतो.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, नदीत उडी घेताना अक्षयने आपल्या दुचाकीसह इतर साहित्य पुलावर ठेवले आणि त्याने उडी मारली. नदीपात्रात उडी घेणारा तरुण खाजगी इलेक्ट्रिशीयन असुन तो होतकरु व मेहनती असून त्याला दोन बहिणी असल्याची माहिती मिळाली आहे.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच अक्षयला शोधण्यासाठी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies