Type Here to Get Search Results !

पत्नीनेच केली पतीची हत्या; आत्महत्येचा केला बनाव!नागपूर : नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाजपेयीनगरमध्ये दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केली. असा बनाव रचलेल्या पत्नीचा पोस्टमार्टममध्ये भांडाफोड झाला. यानंतर सदर महिलेला अटक करण्यात आली.याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृतक ग्याणी यादव सोबत आरोपी राणीचे १८ वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र कुठलाही कामधंदा न करता दारू पिऊन येत ग्यानी घरी गोंधळ घालत होता. त्यामुळे मुलांवर देखील त्याचा परिणाम होत असल्याने संतापलेल्या पत्नीने त्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. तर राणीने रॉडन डोक्यावर मारून त्याचा खून केला. यानंतर बायकोने नवऱ्याने शिलाई मशीनवर डोके आपटून आत्महत्या  केल्याचा बनाव रचला. हत्या केल्यानंतर नवऱ्याने शिलाई मशीनवर डोके आपटून आत्महत्या केल्याची माहिती परिसरात दिली. दरम्यान, हा सर्व प्रकार समजताच  पोलिसांनी त्याची नोंद घेतली. मात्र शवविच्छेदन अहवालात सत्य समोर आल्याने पोलिसांनी आरोपी पत्नी राणीला अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies