Type Here to Get Search Results !

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दिग्गज नेत्यांनी सुचवले ‘यांचे’ नाव?; जाणून घ्या ...!



नवी दिल्ली : येत्या १७ ऑक्टोबरला कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. अशात कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आपली मते मांडली आहेत. कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी राहुल गांधी हेच पक्षाचे अध्यक्ष व्हावेत असा आग्रह केला आहे. मात्र, अनेक नेत्यांचा राहुल गांधींच्या नावाला विरोधही आहे. काही दिवसांपुर्वीच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली होती, यावेळी त्यांनी सोनिया गांधींना दिलेल्या पत्रात राहुल गांधीवर निशाणा देखील साधला होता. त्यामुळे अशा वातावरणात कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.



दरम्यान, राहुल गांधी हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास तयार नसल्यास, तर पक्षातील कोणत्या नेत्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. तसेच, सोनिया गांधी या पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार की गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होणार या दृष्टीने देखील विचार केला जात आहे. १९ ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागेल, त्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies