Type Here to Get Search Results !

पाणी घेण्यासाठी जात असताना दोघांनी केला महिलेचा विनयभंग!



नाशिक - शहरातील मध्यवर्ती भागातील शरणपूररोडच्या एका इमारतीच्या तळमजल्यात पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा दोघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. 


याबद्दल अधिक माहिती अशी कि, पिडित महिला सोमवारी (दि.८) तळमजल्यात पाणी घेण्यासाठी जात असताना संशयित आरोपी निरज नारंग व सतबीर कौर नारंग (४६) यांच्या पैकी नीरज नारंग याने पिडितेला जवळ ओढून तिचा विनयभंग केला. नारंगने पिडितेच्या मनास लज्जा निर्माण होणारे वर्तण केले असताना संशयित  सतबीर कौर यांनी पिडितेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामु‌ळे पिडिता हि गोष्ट तिच्या आईला सांगण्यासाठी जोराने आवाज देऊ लागल्याने सतबीर कौर नारंगने पिडितेला जोरदार धक्का देऊन ढकलून दिले. त्यामुळे पिडितेच्या डाव्या डोळ्याच्या भूवईवर जखम झाली आहे.


दरम्यान, पिडितेने दोन संशयितांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies