Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री शिंदेंची बिघडली तब्येत;आजच्या सर्वच बैठका रद्द!



मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बिघडली असल्याने त्यांच्या आजच्या सर्वच प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तर, डॉक्टरांनीही मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 4 वेळा दिल्लीवारी झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन दिवस-रात्र उशिरापर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. एकीकडे प्रशासकीय बैठका आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांसाठी मेळाव्यात भाषणबाजी करताना ते दिसून येतात. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडली आहे. शरीरावर ताण पडल्याने थकवा आला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, त्यांच्या आजच्या कार्यालयीने वेळेतील नियोजित सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies