Type Here to Get Search Results !

डुकरांच्या वाटणीवरुन तीन जणांनी केला तरुणावर गोळीबार!

 


जालना - जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील हातडी येथे आज सकाळी बुलेटवरून आलेल्या 3 अज्ञातांनी गावठी पिस्तूलातून तरुणावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जीवन जाधव असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, परतुर तालुक्यातील हातडी येथे घनसावंगी तालुक्यातील कंडारी परतुर येथील जीवन जाधव नावाच्या व्यक्तीने पाळलेली डुकरे सोडलेली आहेत.आज सकाळी जीवन जाधव हा डुकरांची देखभाल करण्यासाठी हातडीत आला होता. यावेळी बुलेटवरून आलेल्या अज्ञात 3 इसमांनी त्याच्यावर गावठी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या.या घटनेत जीवन जाधव याच्या डोक्यावर गोळ्या लागल्याने गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी जालना येथे हलविले आहे.



दरम्यान, बुलेटवरून आलेले हल्लेखोर हे तिघेजण असून, ते गोळ्या झाडून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. डुकराच्या वाटणीवरून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies