Type Here to Get Search Results !

संसार मोडण्याची धमकी देत महिलेवर केला बलात्कार!



बीड: बीडमध्ये एका ऊसतोड कामगार महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली  आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आरोपी हा पीडितेला तिचा संसार मोडण्याची धमकी देत होता, अशी तक्रार पीडितेने केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  पीडित विवाहित महिला २९ वर्षांची आहे. ती पतीसोबत ऊस तोडणीला गेली होती. त्या ठिकाणी उसतोडणीला आलेला आरोपी राम याच्यासोबत तिची ओळख झाली होती. ऊसतोडणी करून परत आल्यानंतर राम हा वारंवार तिला फोन करत होता. त्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यावर तू माझ्याशी बोलली नाहीस तर, तुझा संसार मोडेन, अशी धमकी तो देत होता. तसेच पीडितेला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 



दरम्यान, पीडितेने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी रामविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies