Type Here to Get Search Results !

४० आमदार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेले, मात्र अब्दुल सत्तारांचे कोणते हिंदुत्व: ‘यांनी’ केला हल्लाबोल!



जळगाव : शिवसेनेतील चाळीस आमदार फुटून बाहेर पडले आहेत. एक वेळेस समजू शकतो, की चाळीस आमदार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेले. मात्र अब्दुल सत्तार कशाला गेले हे मोठ कोडंच आहे. सत्तार यांचे कोणते हिंदुत्व आहे; अशी खोचक टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.



तसेच,  मिटकरी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील निशाणा साधत मुनगंटीवार यांनी नवीन जीआर काढला. हॅलो म्हणायचे नाही तर वंदे मातरम म्हणा; असे म्हणत मुनगंटीवार यांची खिल्ली उडवली. 



दरम्यान,  मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस  जनसंवाद यात्रामध्ये आमदार मिटकरी बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies